🙏🙏 ह्या वर्षी इयत्ता पाचवी सहावी व सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगतीसाठी व त्यांच्या व्यक्तीत्व विकासासाठी शाळेमध्ये विवीध कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत . ज्यामध्ये
-विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० पासून ते ४ .०० वाजेपर्यंत शाळेची वेळ
-प्रत्येक विषय अध्यापनासाठी एक तासाचा कालावधी
-दररोज निरोगी आरोग्यासाठी आसन व प्राणायाम
-शनिवारी विद्यार्थ्यांचा शाळेतील मुक्काम
-शनिवारी माझे आरोग्य माझा आहार ह्या विषयावर व्याख्यान मालीका
-विद्यार्थ्यांचे नियमित आरोग्य तपासणी
-शाळेमध्ये निसर्गोपचार आरोग्य शिबीराचे आयोजन
-राष्ट्रीय पातळीवरील बाहेर च्या राज्यातील मुलांसोबत ग्रीष्मकालीन शिबीरात विद्यार्थ्यांचा सहभाग
-रविवारी इंग्रजी विज्ञान गणिताचे शिकवणी वर्ग
या व अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांच्या अभ्यासाची गती वाढलेली आहे वाचन कौशल्य भाषण कौशल्य लेखन कौशल्य श्रवण कौशल्य आत्मसात होत आहे . त्यांच्यामध्ये जगण्यासाठी आवश्यक कौशल्य व आरोग्यदायी , स्वच्छतेच्या योग्य सवयीं ची रुजवण होत आहे
त्याचप्रमाणे ह्या सर्व बाबींचे गेल्या दोन आठवड्या पासून संस्थेतील शोधार्थी विद्यार्थ्यांकडून इयत्ता पाचवी सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे विविध विषयातील अध्ययन पातळी व व्यक्तीमत्वातील विविध गुण विषेश व इतरही बाबींचे मापन करण्यात येत आहे .
त्यांच्या मापनातील निष्कर्षावरून व दैनिक विषय अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या निरीक्षणातून ह्या विद्यार्थ्यासाठी ह्या सत्राच्या शेवटी दिपावली सुटीदरम्यान दिनांक ४/११/२०२४ ८/११/२०२४ पर्यंत महाराष्ट्र शासन पुरस्कृत सेतू अभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या शिबीरात मराठी इंग्रजी व गणित ह्या विषयांच्या अध्ययन निष्पतीनुसार विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होणार आहे ज्यामुळे पुढील अभ्यासाची गती वाढेल व विद्यार्थ्यांचे संकल्पना समजण्यातील अडथळे दूर होतील .
आपणा सर्व पाचवी सहावी सातवी तील विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की आपल्या मुलामुलींना ह्या शिबीरासाठी उपस्थित ठेवावे विद्यार्थी उपस्थिती अनिवार्य आहे .हे शिबीर निवासी व निःशुल्क आहे. त्यासंबधीचे सर्व नियोजन आपणा पर्यंत पोहोचेल. धन्यवाद
त्यांच्या शालेय

Yogesh Shastri ji