🌺 वसंत 🌺
हा वसंत पुनः
फुलनार आहे,
नव पानांफुलांनी,
बहरनार आहे.
शिशीर झळा सोसूनी,
पुनः पळस उमलनार आहे.
वसंत ऋतु चे करुया स्वागत,
विविध रंग उधळणार आहे.
तप्त उन्हाच्या सोसून झळा,
प्रकृति चा उभा मळा.
उन सावल्यांचा खेळ निराळा ,
वसंत पुनः फुलनार आहे.
करुया स्वागत वसंत ऋतु चे,
उत्सव गीत गाउनी.
उधळुन रंग रंगबिरंगे,
वसंत आला बहरुनी.
विकारांची पेटवून होळी,
तुप पुरणपोळी खाऊया.
आनंदाचे गीत गाऊनी,
हसत खेळत जगुया.
___ विनोद मधुकर म्हात्रे