चेतना विकास प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यालय परडा

दोन दिवसीय कार्यशाळा
समाधान आणि समृद्धी
24 आणि 25 नोव्हेंबर
(24 तारखेला परडा येथे आणि 25 तारखेला परळी येथे)

सन्माननीय पालक,
मागील सात वर्षांपासून आपण सर्वजण आपल्या पाल्या करिता शिक्षण आणि आरोग्य विषयक समाधान कसे मिळेल ह्याबद्दल शिक्षण प्रशिक्षण उत्साहाने घेत आहोत. येत्या नव वर्षाच्या पूर्व संध्ये पासून आपण आता आपले घर कसे चालेल ह्या बाबत जाणून घेणार आहोत. घर चालायचे म्हणजे घरात आपसातले संबंध तक्रार मुक्त होणे आणि सर्वांना पुरून उरेल अशी अन्नधान्याची समृध्दी नांदत राहावी असेच सर्वांना वाटते. असे आपले घर चालले तर आपली मुले आपल्याच घरी गावात सुखाने जगू शकतील असा आमचा विश्वास आहे. कुटुंबात समाधानाने कसे जगता येईल ह्या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी आपण 24 तारखेला एकत्र येऊन 25 तारखेला एक सहल म्हणून परळी येथे कृषिकुल संस्थेला भेट देणार आहोत. इच्छुक शेतकरी पालकांनी संपर्क साधावा. 40 बंधू जाऊ शकू. परळी येथे निवास आणि भोजनाची निःशुल्क सोय झाली आहे.जाणे येणे हा एस टी भाडे /डिझेल खर्च आपण द्यावा आणि उर्वरित खर्च संस्था करणार आहे. आपण स्वतंत्र वाहनांनी जाणार आहोत.

संपर्क :
श्री गजानन सर
88301 71417
श्री दिलीप सर

+91 99212 02077


Back